Showing posts with label चारोळी. Show all posts
Showing posts with label चारोळी. Show all posts

Friday, January 20, 2017

चार ओळी





गावच्या वाहत्या ओढ़यातील
एक 'खेकड़ा' सोडायचा म्हणतोय 'मेंदूत'
काढुंदे एखदाचं पोखरुन
'झिनझिन्या' आणणाऱ्या
तुझ्या आठवणींना.....

चार ओळी



गेली कित्येक वर्षे हृदयाच्या कुमकुवत
रॅमवर चालणाऱ्या,
मेंदूतील आठवणींच्या अनलिमिटेड
हार्ड डिस्कला,
आज घेतलीय फॉरमेट मारायला...

चार ओळी

स्मरणकेंद्राच्या ओल्या मेमरीत
तुझ्या आठवणींचे 'स्क्रीनशॉट' साठवलेत
एखदाची ये घेवून दोन जीबीचा पेनड्राइव
अन जा करुन कायमचे 'कटपेस्ट'

चार ओळी



"मेंदूला मेंदू कनेक्ट करुन
दे ढकलुन एखदा 'ब्लुटूथने'
तळात लपवलेले,
आठवणींचे 'जुने स्क्रीनशॉट..."

चार ओळी



 हे नशिबा एकच काय
कर हजार वार,
चिंध्या बांधून लपवीन जखमा
पण नाही कधीच हरणार.

चार ओळी



फेसबुकच्या अकाऊंटला टाकलाय तुझ्याच नावाचा पासवर्ड.
अंधारातून मार उडी भिंतीवर
अन हॅक करुन मार धडाधड गोळ्या,
प्रेगनंट राहिलेल्या माझ्या पोस्टना...