Thursday, November 22, 2018

हौसा आक्का

दिवस उगवायच्या आधीच मारुतीला पाणी घालायला गेलेली पवाराची शांता गल्लीतनं ओरडतच आली, "हौसा म्हातारी कवा रातचीच अंथरुणात मरून पडलीया! बघा कि कसलं मराण म्हणायचं हि!" माझे कान गल्लीच्या दिशेने. शरीर अंथरुणात. डोळे नुसतेच सताड उघडे. क्षणात घड्याळ्याचे काटे जुन्या काळाकडे उलटे सरकू लागले. डोळ्यांच्या उघड्या स्क्रीनवर हौसा म्हातारीचा जीवनपट सुरू झाला. हौसा म्हातारी होतीच तशी. भले जिजाबाई सारखी ती आदर्श माता नसेलही. झाशीच्या राणीसारखी तलवार घेऊन रणांगणावर ती कधी लढली नसेलही. सावित्रीबाई सारखं संघर्ष करून तिनं शिक्षण घेतलं नसेलही. तरीही ती त्यांच्याइतकीच लढाऊ होती. जिद्दी होती. करारी होती. तिचं संपूर्ण नाही पण अर्धं संघर्षमय आयुष्य या डोळ्यांना पाहता आलं. क्षणात या साऱ्या गोष्टींच्या आठवणी बनून मेंदूच्या वाटेने खाली सरकत डोळ्याभोवती जमू लागल्या. हौसा म्हातारीच्या शेकडो आठवणी डोक्यात. लिहायला बसलो तर दिवस पुरणार नाही. पण सांगायलाच हवी तिची गोष्ट.

पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....


©ज्ञानदेव पोळ
प्रातिनिधिक फोटो 

1 comment: