Tuesday, January 8, 2019

एका कोयत्याची गोष्ट

परवा वर्धनगडाचा घाट उतरताना डावीकडं सहज नजर गेली आणि एका साखर कारखान्याची चिमणी आभाळात धूर ओकताना दिसली. अशा जुन्या डोंगरांच्या पायथ्याला महाराष्ट्रात आता कितीतरी चिमण्या दिवस रात्र ऊसाच्या चुया पिऊन धुराडी जाळत राहताना दिसतात. पण यावेळी त्या उंच आभाळातल्या ढगात काळ्याभोर धुरांची वर्तुळे मिसळत जाताना त्यात अचानकच एक मानवी चेहरा तयार होताना दिसला. काही क्षणात त्या चेहऱ्याला अंग फुटलं. हातात कोयता घेतलेला एक मानवी सांगाडा क्षणात नजरेला दिसू लागला. मला खुणावू लागला. हाका मारू लागला. हसू लागला. तो चेहरा होता मुर्गाप्पा मुकादमाचा. होय! मुर्गाप्पा मुकादम. पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....


No comments:

Post a Comment