फाट्यावरून डाव्या बाजूनं गावाकडे वळसा घेतला कि माळावरच्या टेकडीवर दहा-पंधरा घरांची कुंभार वस्ती लागते. या वस्तीवरच्या चार पाच घरातली तरुण पोरं शिकून शहराकडे गेल्यानं त्यांची घरं आता सिमेंट काँक्रीटची बनलीत. बाकीची घरं तशीच जुन्या वळणाची. आत वावरणाऱ्या जुन्या माणसासारखीच. आपलं जुनं पण टिकवून धरलेली. या वस्तीत मध्यभागी मंगलोरी कौलांचं अर्ध कच्च एक पडकं घर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. बदलाचा कुठलाच वारा अंगावर न पांघरलेल्या त्या घरात पारुबाईचा 'लुकडा शिवा' राहतो. पारुबाई त्याची आई. मोठी धीराची बाई. एकेकाळी नवऱ्याच्या माघारी लहान शिवाला सोबत घेऊन, कुंभाराच्या गरगर फिरणाऱ्या चाकावर मातीच्या भांड्याना ती कोरीव आकार देत बसलेली दिसायची. तिच्या घरापुढच्या मातीच्या चाका भोवती सदैव गाडग्या मडक्यांची रांग लागलेली असायची.
पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....
1. Notionpress Store
2. Amazon store
3. Flipkart store
©ज्ञानदेव पोळ
No comments:
Post a Comment