रत्नप्रभा होतीच तशी. एका क्षणात कुणालाही आकर्षित करून घेईल. नुसतीच लग्न करून नांदायला आलेली. इतकी सुंदर बाई हणमंताला कशी काय मिळाली याची साऱ्या गावभर चर्चा रंगायची. लांबसडक नाक. पाणीदार डोळे, गोलाकार रेखीव चेहरा, चौकटीला टेकेल एवढी उंची आणि मागे पाठीवर सोडलेल्या लांबसडक केसांचा नाजूक भार. ती हसली म्हणजे प्राजक्ताची फुलं सांडल्याचा भास व्हायचा. इतकं देखणं रूप तिला लाभलेलं. जवानीत शिरलेली तरणीबांड पोरं गावाबाहेरच्या तिच्या घरापुढं दिवसभर घुटमळत राहायची.
पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....
पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....
1. Notionpress Store
2. Amazon store
3. Flipkart store
©ज्ञानदेव पोळ
No comments:
Post a Comment