Thursday, September 28, 2017

नाना मास्तर

सदानंद परवा पुण्यात भेटला. म्हणाला, नाना मास्तर गेले. मी हळहळलो. गप्प झालो. भर गर्दीत अख्खा नाना मास्तर डोळ्यापुढं उतरला. शहरातल्या सिमेंटच्या रस्त्यावरून मी आयुष्याला पळवीत असताना दूर गावाकडची कितीतरी माणसं आजवर अशी गळून पडलेली. काही कायमची नजरेआड होत गेलेली. नाना मास्तर त्यापैकीच. नाना मास्तर म्हणजे एकेकाळी गावची शान. निदान आमच्यासाठी तरी. नाना मास्तरचा केवढा दरारा. स्वातंत्र्याची पहाट व्हायच्या आसपास नाना मास्तरचा सूर्य आमच्या गावात उगवलेला. गरिबीत जन्मला. गरिबीत वाढला. शिकलासुद्धा गरिबीतच. . निस्वार्थी माणूस. दिलदार मनाचा. गरिबांची पोरं मास्तरनं पदरमोड करून शिकवली. न शिकणारी सुद्धा ओढून नेऊन शाळेत बसवली. आडल्या नडल्याला मदत करावी तर मास्तरानच. आखाडात पावसाची उभी धार सुरु असावी. नदीचं पाणी पुलाला लागलेलं असावं आणि अशावेळी गरीबाघरच्या अवघडलेल्या बाईला कळा सुरु व्हाव्यात. कुणीतरी मास्तरचं दार वाजवावं. आणि मास्तरनं क्षणात गाडी जुंपून तालुक्याचा दवाखाना गाठावा. कुणाचा भांडण तंटा मिटवावा तर मास्तरानीच.

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....

#ज्ञानदेवपोळ
प्रतीकात्मक फोटो

No comments:

Post a Comment