Thursday, August 3, 2017

आभाळातली परी

तेव्हा आमच्या ज्युनिअर कॉलेज्यात जीन्स पॅन्ट घालून डोळ्यावर काळा गॉगल लावणारी पहिली पोरगी म्हणजे परी”. सगळी पोरं पोरी सायकलवरून नाहीतर फारफार एस.टीला लोंबकळत कॉलेज्यात यायची. जायची. तर ही बया यामहा मोटरसायकलवरून सायलेन्सरचा जोरात आवाज काढीतच गेटमधनं आत शिरायची. अशा या परीवर आख्खं कॉलेज मरायचं. मग आम्ही तरी मागं कसं असू बरं. वाटायचं अशी पोरगी पटली तर आपलं भाग्य उजळणार. आम्ही उगीच काय बाय स्वप्नं पण बघायचो. पण व्हायचं काय परीच्या जवळ जायचं म्हणजे हात पाय आधीच गळायचं. तिच्याशी बोलायचं म्हणजे लवकर जिभच वळायची नाय. ह्रदयाची नुसती धडधड व्हायची. बरीच जण जवळीक करायचे. या ना त्या कारणाने बोलायला बघायचे. पण परी काय कुणाच्या हाताला लागायची नाही. शेवटी आपली अभ्यासात प्रगती बरी असल्याने ही बयाच बोलायला लागली. नुसत्या तिच्या बोलण्यानंच वाटायचं जुळलं...

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....


1 comment:

  1. हि पोस्ट वाचून सैराट मधल्या आर्ची डोळ्यासमोर आली!

    ReplyDelete