Tuesday, May 30, 2017

'नटसम्राट'अभिरुचि सिटीप्राइड ला 'नटसम्राट' पाहून आलो. ग्रैजुएट ला असताना हे नाटक अभ्यासक्रमात होते. 'टु बी ऑर नॉट टू बी', 'कुणी घर देता का..', 'दूर व्हा..' अशी बरीच स्वगते अगदी आजही तोंडपाठ आहेत. वि.वा. शिरवाडकर तथा तात्यासाहेब यांनी 'किंग लिअर' वरून हे 'नटसम्राट' नाटक लिहले आहे. या नाटकाचा आता सिनेमा बनवला आहे. नाना पाटेकर यांनी साकारलेल्या 'गणपतराव बेलवलकर'ने अभिनयाचा कळस चढवला आहे.पुढे दीर्घकाळ लोक नानाना विसरणार नाहीत हे नक्की. अगदी वन मॅन शो! सिनेमाच्या तांत्रिक बाबीकड़े खुप लक्ष्य घातलेय मांजरेकरनी. इतर सर्वानी आपल्या भूमिका जबाबदारीने सांभाळल्यात. विशेषता विक्रम गोखले यानी. नाटकाचा सिनेमा करणे तसे सोपे काम नाही. पण ते आव्हान येथे लीलया पेललय.मात्र गणपतराव बेलवलकरांचं कुटुंब दाखवताना मूळ नाटकात असलेली नली, शारदा,नंदया ही नावं का बदललीत नाही कळाले. अर्थात नानांच्या अभिनया पुढे या छोट्या गोष्टी खुप मागे पडतात. सिनेमा संपल्या नंतर टाळ्यांचा आवाज होतो आणि सर्वजन जाग्यावर निशब्द होतात. अर्थात पूर्वाधापेक्षा उत्तरार्ध छान जमलाय. मध्यंतरा नंतर काहीसा द्विधा मनस्थितित असलेला प्रेक्षक वर्ग सिनेमा संपल्या नंतरही जेव्हा थियटर बाहेर न पड़ता जागेवर उभा राहून बेलवलकरांची स्वगते ऐकतो यातच या सिनेमाचे यश आले आहे. शेवटी प्रत्येक मराठी माणसासाठी हा चित्रपट एक चांगला अनुभव असेल. हा अनुभव सर्वानी घ्यायलाच हवा......


No comments:

Post a Comment