Tuesday, May 30, 2017

'बाजीराव मस्तानी '


                                             
सिटी प्राईड सिह्गड रोड मल्टीप्लेक्स मध्ये 'बाजीराव मस्तानी ' बघितला... शो सुरळीत सुरु होता.. कुठेही काहीही गडबडझाली नाही. जुना काळ आणि पेशवाईचा इतिहास भन्साळीनी लीलया पेललाय. रणवीर नेबाजीरावचा रंगेलपणा अगदी हुबेहूब वठवला आहे... शिवाय काशीबाई-मस्तानीचा पिंगा तरएकदम फक्कड जमला आहे. त्या पिंग्याला हज्जार शिट्ट्या मिळाल्या.. ना.स.ईनामदारांच्या राऊ या कादंबरीवर आधारीत हा सिनेमा असल्याने मराठी बाणा जपन्यासाठी अत्यंत कुशलतेने मराठी शब्दांचा वापर केलेला आहे. काशीबाई आणि मस्तानीला 70-80 च्या वर साडया नेसवुन पेशवाईचा तो श्रीमंत थाट आणि काळ दाखवन्यात भन्साळी यशस्वी ठरलेत. पुन्हा एकदा पिक्चर बघावासा वाटतो आहे..!! जर खऱ्या काशीबाईने कधी हाती तलवार घेतली नसताना सिनेमात तसे दाखवलेले चालते तर मग मस्तानी सोबतचा पिंगा का चालत नाही असा
प्रश्न पिक्चर पाहून बाहेर येताना लोक विचारत होते..मी न्हवे !! बाकी जाता-जाता एवढेच सांगावेसे वाटते -कि
दीपिकाच्या पायात लावणीचे तोडे घालायला नको होते भन्साळीने कारण लावणीचा जन्मच मुळात पेशवाई नंतर ५०-६० वर्षांनी झाला, आणि पेशवे गणेशाचे भक्त असताना भडांरा उधळीत मलहारीचे गाणे का दाखवले ते नाही कळाले, बाकी पिंगा सारख्या गोष्टी टाळता आल्या असत्या तर बरे झाले असते पण जेव्हा एखादा दिग्दर्शक 100-150 कोटींचा सिनेमा बनवतो तेव्हा त्याला त्यामागची व्यावसायिक बाजू देखील ध्यानात घ्यावी लागते. यामागे कोणालाही जानून बुजुन दुखवन्याचा हेतु नसावा. फक्त आपली कलाकृती अजरामर व्हावी आणि आर्थिक नफाही मिळावा ही अपेक्षा असावी. पण एक नक्की या निमित्ताने दिल्ली सकट संपूर्ण भारतावर सत्ता स्थापन करणाऱ्या बाजीराव सारख्या महान योद्ध्याचा इतिहास
जगासमोर येतो आहे. हि सगळ्या मराठी लोकांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.


No comments:

Post a Comment