Monday, May 29, 2017

हिरा नानी

...तर चांगलं तीन वर्षे धान्य चारून गुबगुबीत फुगलेला तुरेबाज कोंबडा म्हसोबाला कापल्यावर नाना मला म्हणाला, "चांगलं दोन शेर मटण पडलंय बघ!" असलं आमंत्रण मिळाल्यावर आपुन दुपारपासून लई खुशीत होतो. उगीच इकडून तिकडून फिरत होतो. मला असं फिरताना बघून रस्त्यानं निघालेली हिरा नानी गडबडीनं माझ्याकडं आली अन "कवा आलास?" या तिच्या प्रश्नाचं उत्तर दयायच्या आधीच पुढं म्हणाली, "आरं किलुभर गरा अन तांदूळ आणून शिराभात केलाय! म्हाताऱ्याची आज पुण्यतिथी हाय! गरीबाच्यात कोण येतंय जेवायला! तू तरी ये सांच्याला, म्हातारा तुझं सारखं नाव काढायचा?"...


No comments:

Post a Comment