Tuesday, May 16, 2017

आई


मी पहिलीय...
भल्या पहाटे चांदणी उगवायला उठून
हातात खुरपं घेऊन दिवस रात्र 
रानामाळात खपणारी आणि प्रचंड पडलेल्या दुष्काळात सुद्धा 
पोटाला आलेली बारकी पोरं जगवण्यासाठी घरात दाणा नाही म्हणून 
मकंची कणसं जात्यावर भरडून, 
त्याच्या कण्या शिजवून 
पोटाची आग विझवणारी 
आणि 
आमच्या हातात खुरप्या ऐवजी 
लहानपणीच लेखणी दिलेली 
पांदीतल्या ज्ञानदेवची आई 
"मालाबाई पोळ."


No comments:

Post a Comment