Tuesday, May 16, 2017

मी

मी पाहिलाय...
सुट्टीच्या दिवसात हातात बांबू घेऊन
ओढ्या वगळीनं दिवसभर
करंजीच्या झाडावरच्या करंज्या झाडून,
वाळल्यानंतर चिमुकल्या हातांनी फोडून
तालुक्याच्या आठवडी बाजारात
सदा व्यापाऱ्याला विकून
मिळालेल्या पैशातून बाबा कदमांच्या
कादंबऱ्या विकत घेऊन
म्हसरांमागं वेड्यासारखा वाचत बसणारा
गावगाड्यातला खाक्या चड्डीतला
शाळकरी "ज्ञानदेव पोळ"

No comments:

Post a Comment