Saturday, April 15, 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकरबाबासाहेब हे केवळ दलितांचेचे कैवारी होते असे राजकीय दृष्ट्या इथल्या व्यवस्थेत रुजवणाऱ्याना शुभेच्छा! बाबुराव बागुलांची चोरलेली जात, सूर्व्यांचा मार्क्सवाद, दया पवारांचा कोंडवाडा, आणि बांबलीच्यानो इथे जन्म घेऊन तुम्ही बरबाद झालात!असला ढसाळांचा विद्रोह विझवू पाहणाऱ्याना शुभेच्छा! शिका आणि संघटीत व्हा या आरोळीतून पेटून उठलेल्या दलितांच्या चळवळीचे सुठे भाग करून त्यांना विकत घेऊन निवडणुकांच्या ई.व्ही.एम. मशीनवर तुंबडी भरणाऱ्या धर्मांध राजकारण्यांना शुभेच्छा! आंबेडकरी जनतेचे कोणतेच निर्णायक प्रश्न न सोडवता, आर्थिक धोरण न राबवता केवळ भावनांच्या मनोऱ्यावर झुलवत ठेवणाऱ्या दलित नेत्यांना शुभेच्छा! साहित्याच्या प्रांतात दलित साहित्य हे आंबेडकरी साहित्य की बौद्ध साहित्य? असल्या खेळात अडकून पडलेल्या दलित साहित्यकांना शुभेच्छा! तर बाबासाहेबांच्या नुसत्या जयघोषात न अडकता जागतिकीकरणात व्यापक आंबेकरवाद उभा करू पाहणाऱ्या नव्या पिढ्यांनाही शुभेच्छा! जयभीम म्हणताना तोंडातली जीभ अडकणाऱ्याना शुभेच्छा! निळा गुलाल, निळ्या पताका बघून हसणाऱ्या येडपटाना शुभेच्छा! आंबेडकर न वाचता न कळता खोट्या शुभेच्छा देणार्यानाही शुभेच्छा! सकाळपासून फेसबुकवर बाबासाहेबावर पोस्ट लिहू कि नको या विचारात अडकून पडलेल्या प्रसिद्ध टी.आर.पी. पटूनांसुद्धाशुभेच्छा! आणि, जातीव्यवस्थेने घातलेल्या मणामणाच्या बेड्या वागवत, माना खाली घालून पिढ्यान पिढ्या चालत राहिलेल्या समाजात क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवून वणवा पेटवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकराना दंडवत!!!


2 comments: