Saturday, April 15, 2017

आठवणीएखाद्या वारुळातून भसाभसा मुंग्या बाहेर याव्यात तश्या गर्दीने फुलून गेलेल्या त्या स्टेशनच्या प्लॉटफॉर्मवर लोकलच्या डब्यातून बाहेर पडलेली दोन तरुण डोकी एकमेकांना अचानक येवून धडकली...
पुरुषी डोक्याच्या आत असलेल्या मेंदूतून नकळत आवाज बाहेर पडला,
"कशी आहेस?"
अचानक आलेलं गार वारं रानातल्या पिकांना सळसळ करत हलवून जावं तश्या तिच्या शरीरातील नसा जागच्या जागी काही क्षण हलल्या. अन काळीज विझवत शांतपणे त्याच्या डोळ्यांत पहात ती एवढच म्हणाली,
"आता दिवसा तरी मी तुला विसरलेय! तळातल्या आठवणी ओठावर नकोत आता! नाहीतर तुझ्या आठवणींना जाळून त्यावर फुलवलेला माझा संसार वाकेल..."

No comments:

Post a Comment