Saturday, April 15, 2017

आत्याबाई


गोठ्यातली शेण घाण ऊरकून म्हशीच्या धारा काढून चंद्रा स्वयंपाक घरात आली आणि दुधाची चरवी चुलीपुढं ठेवत कोपऱ्यात फुगून बसलेल्या सासूकडं तोंड करुन म्हणाली,
"
आत्याबाई"
म्हातारीचं हूं नाय की चूं नाय बघुन चंद्रा परत म्हणाली,
"
चुळ भरा की चहा टाकते?"
जवळ बसलेली सुन बघुन सकाळपासून गप्प बसलेली म्हातारी भुईकडं बघत म्हणाली,
"
चन्द्रे वार कोंचा गं आज?"
"
आज रईवार की वं?"
तशी सकाळ पासून फुगलेली म्हातारी हळूच म्हणाली,
"
गावात बकरं कापलय का यितीस का गं बघुन चन्द्रे!"

No comments:

Post a Comment