Saturday, April 15, 2017

भागूबाई


पुसातल्या जत्रत वाडीच्या देवीसमोर साठलेलं ज्वारीचं पीठ पुज्याऱ्यानं ओट्यात घातल्यावर अंधार पडायला ओढा ओलांडून घरी पोहचलेली वस्तीवरची भागूबाई गडबडीनं चुलीला लागली. अन वरचा सुतळीच्या वातीचा दिवा पेटवत शेजारची पिशवी हुडकत पदराला बिलगलेल्या दोन लहान हडकुळ्या लेकरांना ती एवढंच म्हणाली, "साठलं तर देवीसमोरचं किलोभर खारीक खोबरं तुम्हासनी रतीबाला देतो म्हणालेत पुजारी काका."

No comments:

Post a Comment