Tuesday, February 14, 2017

प्रेमावर बोलू काही....



 रत होते आणि  त्पन्न २२०० कोडॉलर्सच्या घरात होतं।
प्रेम म्हणजे तो. प्रेम म्हणजे ती. प्रेम म्हणजे सर्वस्व. प्रेम म्हणजे ह्रदय. प्रेम म्हणजे विश्वास. प्रेम म्हणजे त्याग. प्रेम म्हणजे जबाबदार्या. प्रेम म्हणजे गुंता इत्यादी. इत्यादी. इत्यादी. प्रत्येक मेंदुनुसार व्याख्या बदलत जाते. पण खरे प्रेम आत साठून राहते. क्षणिक प्रेम उडून जाते. प्रेम म्हणजे सदाचीच टवटवीत राहणारी फुले. प्रसन्नता, बहर, उत्कटता हे प्रेमाचे सामर्थ्य. प्रेमाचे वेड प्रेमिकांच्या हदयात असते. प्रेमाने फुले दिली जातात तेव्हा मन उत्कटतेने काठोकाठ भरून येते. तिने साद देताच तो गाव-शहर ओलांडत, संकटावर मात करीत तिच्या भेटीसाठी निघतो. त्याला ऊन, वारा, पाऊस, रूढी परंपरा  या कशाचेच भय वाटत नाही. मिलनगंध हा प्रेमाच्या विश्वातील उत्कटगंध असतो. विरहाच्या वनव्यानंतर हे मिलन झाले तर उत्कटतेची पौर्णिमाच बहरते. म्हणूनच प्रेमवीर काहीही करायला तयार असतात.   
पण प्रेमाच्या आजूबाजूला एक समाज वावरत असतो. आणि तो समाज जगत असतो काही संकेतानुसार.  कसे जगायचे ते जगाने ठरविलेले असते. तर प्रेमिकांचे जग वेगळे असते. त्या जगाचे आणि या जगाचे संकेत वेगळे असतात. म्हणून ही दोन जगे कधीच एक होऊ शकत नाहीत. कारण प्रेम म्हणजे ऊन - सावलीचा खेळ असतो. पाहता पाहता दोघात अंतर येते. बोलता बोलता चुका होतात. मग एकमेकांचा छळही सुरु होतो. दोघांचे हे नाते पुरुषाला सामर्थ्य देत असते. पण प्रीतीच्या तारकेने आपल्या सौंदर्याने भुलवावे, फुलवावे, आणि मग मात्र टाकून जावे असले जीवन एखाद्या कमनशिबी प्रियकराच्या वाट्याला येते आणि मग सुरु होते असह्य वेदनांची एक यात्रा. ती क्षणभर हसते आहे, क्षणात रुसते आहे, तिची चंचलता कमालीची निष्ठुर आहे. त्यामुळे जीव व्याकूळ होतो. तशाच तिच्या चेह-यावरचे निष्ठुर भाव आणि मौन यामुळे प्रियकराला काही कळेनासे होते. तो तिला विनवणी करत राहतो.
तिने त्याच्या जीवनाचे काही धागे सोबत आणलेले असतात. त्यानेही तिच्या जीवनाचे काही धागे सोबत जोडलेले असतात. दोघांनी हसत - खेळत प्रेमाचा गोफ गुंफलेला असतो. तो कधी आणि कसा गुंफला गेला ते दोघांनाही कळलेले नसते.  पण अखेर तो दिवस उजाडतो. ती त्याला सोडून जाते. आणि मग उरतो तो फक्त वेदनांचा डोह. त्याचा संशय खरा ठरतो. प्रेयसी म्हणजे प्रेमाचे एक सोंग आहे हे त्याला कळते.  मग त्याचे ह्दय स्वतःलाच बोल लावते. कमअस्सल जातीचे सौंदर्य आणि त्याविषयीचे प्रेम म्हणजे "पाण्यावरच्या रेषा" होत. त्या रेषा रेखाटून अखेरीस दु:खच लाभणार. याची खात्री त्याला पटते. मनोहर रूपवती, तीव्र, बुध्वती आपली व्हावी म्हणून तो तिला होते नव्हते ते सारे देतो. तिचा प्रत्येक शब्द जीवाच्या जाळ्यात झेलतो. त्याने आपले अंत:करण तिच्या पावलाखाली अंथरले असते. पण ती मात्र नटवा थाट, वैभव, याकडे निघून जाते. उध्वस्त झालेला तो तळमळत राहतो. पण प्रेम म्हणजे काही निर्जीव वस्तू नसते की जी सोडले की संपली. प्रेमाचे धागे अंतरंगात खोलवर गुंफलेले असतात. त्यांच्यावर ताण पडला वा ते धागे तुटले तर वेदना अटळ असतात....


No comments:

Post a Comment