Tuesday, January 24, 2017

"सुंदरी

मी पाहिलीय...
लग्नानंतर वीस वर्षानी पोटुशी राहिल्यावर
बगळ्याच्या पायासारख्या लांबलचक
ढेंगा टाकत गावंदरीच्या रानातली
खरपुस काळी माती खायाला निघालेली
आणि सतत काय-बाय खावसं वाटणारी
टेकडीवरच्या पांडूनानाची कित्येक दिवस उपाशी जगलेली हडकुळी "सुंदरी."

No comments:

Post a Comment