Friday, January 20, 2017

कोंडिबा गायकवाड



मी पाहिलाय...
म्हातारी मेल्यावर छप्परातल्या
सांदाडीत ठेवलेल्या गाडग्या मडक्यातलं हुलगं काढून
कोपऱ्यातल्या जात्यावर स्व:ताच दळून
धुर ओकणाऱ्या चुलीवर
चेपलेल्या जर्मनच्या पातेल्यात
रटारटा माडगं शिजवून
त्यावर बरेच दिवस जगलेला
वस्तीवरचा "कोंडिबा गायकवाड".

No comments:

Post a Comment