Thursday, January 19, 2017

मुर्गाप्पा



मी पाहिलीय....
नदीकाठच्या मळीला, उसाच्या फडात
मोळ्या बांधता बांधताच
हाताच्या मुठीना जोर देत
'बाळाला बाहेर सोडन्यासाठी'
सरीत आडवी झालेली 'यल्लामा'
आणि तिथच मी पाहिलाय
चकाकणाऱ्या धारदार कोयत्याने
'ओली नाळ' कापनारा, पिळदार देहाचा
रापलेला, धिप्पाड मुकादम 'मुर्गाप्पा'.

No comments:

Post a Comment