Thursday, January 19, 2017

हौस्सा अक्कामी पाहिलीय....
तांबरुण गेलेल्या घराच्या पत्र्यावर
ओटित मिळालेला
'नासका नारळ' वाळवून
त्यातील तेलाने 'नातवाला' गाणं गात
आंघोळ घालणारी,
'गरिबीच्या गाळात अखंड रुतलेली'
टेकडीवरची लंगड़ी 'हौस्सा अक्का.'

No comments:

Post a Comment