Friday, January 20, 2017

पांडू तात्याचा जावई

तिकडे समोर पांडू तात्याचा थोरला तापट जावई बऱ्याच वर्षानी सासुरवाडीला आलाय. पिशवीतली केळं समोर मांडून सोप्यातल्या खांबाला टेकून बसलाय. तात्या आताच खालच्या पट्टीसनं नांगरट करुन दमुन आलाय. बैलांना वैरण टाकून राम राम करुन गोठ्याच्या बाहेर मिसरी घासत बसलाय. धुरपा काकी परडयातल्या विहिरीवरनं लगबगीनं जावायासाठी राजंणात ताजं पाणी भरतेय. धुणं धुत बसलेल्या बायांना चालत चालतच 'विटंकर जावाय आल्यात' म्हणून सांगतेय. धाकटी मेव्हणी दाजीसाठी चहा ठेवून चुलीला जाळ घालत बसलीय. बारका पप्या स्तीवरची दोन पोरं सोबत घेवून उकीरंडयावर पळणाऱ्या पाढंऱ्या कोंबडीच्या मागं लागलाय. महमद सुरी आणि पितळी घेवून चांदविला कोंबडीच्या शरण येण्याची कधीपासूनच वाट बघतोय. जावायाला कोंबडीचा भरगच्च नैवेद्य मिळणार अस दिसतय.
...अन मघापासून हे सर्व डोकं बाहेर काढून काढून पाहणारा वस्तीवरचा एकुलता एक पानट्टीवाला राम्या, 'सुहाना मटन मसाल्याची' एक पुडी आज नक्की खपणार म्हणून लईच खुश झालाय...






No comments:

Post a Comment