Friday, January 20, 2017

वस्तीवरचा वृद्ध अण्णामी पाहिलाय...
गावापासून दूर असलेल्या वस्तीवर
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लाईटीचा खांब पोहचल्यावर
गोठ्याभोवती पडलेला उजेड बघन्यासाठी
गोठ्याच्या बाहेर बिछाना टाकून
मिचमिचणाऱ्या डोळयांना उघडं ठेवून
आतल्या अंधाऱ्या घरात
उजेड पाडण्याची स्वप्नं बघत
रात्रभर जागा राहिलेला
वस्तीवरचा वृद्ध अण्णा...

No comments:

Post a Comment