Thursday, January 19, 2017

विधवा पारुबाई




मी पाहिलीय...
धुरपा काकुच्या कोबंड्याने बाग दिली की,
पहाटे उठून गुरांची शेण घाण काढून,
धारा काढून,
वृद्ध सासू सासऱ्यांच्या
औषध पाण्यासाठी गावच्या वेशीवरच्या
शेततळ्यावर 30 रुपये मजुरीसाठी
कासोटा घालून,
दिवसभर माती उकरणारी,
खालच्या आळीतली
विधवा पारुबाई.

No comments:

Post a Comment