Thursday, January 19, 2017

जिद्दी राम्यामी पाहिलाय...
टीबीच्या आजाराने बायको मेल्यावर
जटा झालेल्या बटांना
लाल रेबिनींची फुले बांधून
एकुलत्या एका पोरीला
पाराजवळच्या शाळेत सोडायला निघालेला,
मजूरी करणारा 'जिद्दी राम्या'.

No comments:

Post a Comment