Thursday, January 19, 2017

चंदू नाईकमी पाहिलाय....
वळीवाच्या पावसानं नदीला आलेल्या
तुफान महापुरातनं वाहत आलेला
लाकडाचा ओन्डका जळणाला काढण्यासाठी,
तुटलेल्या पुलावरुन उडी मारुन
बायकोला विधवा करत करत
खालच्या धरणापर्यंत वाहत चाललेला...
'पेशाने शाहीर असलेला
पण गरीबीने मजूर बनविलेला गावकुसाबाहेरचा
हडकुळा 'चंदू नाईक'...

No comments:

Post a Comment