Thursday, January 19, 2017

नामदेवमी पाहिलाय...
पारासमोरच्या वडाच्या झाडावर चिकटवलेल्या
'तमाशाच्या पोस्टरवरील' चित्रातील बायकांना  
कंदिलाच्या उजेडात कचाकचा डोळं मारुन,
शरीरातील धागधुगी जिवंत ठेवत ठेवत
नदीच्या काठाने अंधारातुन वस्तीवर झोपायला चाललेला,
'पन्नाशीतही लग्न झालेला
वरच्या आळीतला अपंग नामदेव...'

No comments:

Post a Comment