Thursday, July 28, 2016

मारुती...




नानीच्या कोंबडयानं बाग दिली तशी रकमाला जाग आली. गड़बडीनं बाहेरच्या छप्पराकडं पळाली. मारुती बाजल्यावर आडवा पडला होता. त्याला गदागदा हलवत रकमा म्हणाली. 'आव उठताय न्हव. रातभर डोळ्याला डोळा न्हाय लागला माझ्या.' रकमानं गळ्याला हात घातला अन बोरमाळ काढून डोळं चोळत उठलेल्या मारुतीच्या हातावर ठेवत म्हणाली. 'ही घ्या अन त्या तालुक्याच्या पेठंतल्या पोतदाराकडं नेवून मोड़ा, मी काळ्या मण्यावर भागवीन. आता या वयात मला कशाला पाहिजेल डाग. फकस्त ही येळ निघुन गेली पाहिजेल, आता पुढ़ काय बी बोलू नगासा.' मारुती उठला. चुळ भरली. पितळीतनं काळा चहा घश्यात ओतला. बाहेर बांधलेल्या बैलांच्या पुढ़ वैरनीची पैंडी विस्काटली. कुडाला टेकवलेल्या सायकलची शीट झाडुन टांग टाकली अन तालुक्याच्या दिशेने अंधारातून 'रँग रँग' करीत कच्चा रस्ता कपित निघाला.

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....


No comments:

Post a Comment