आजुबाजूच्या गावात जसा म्हारवडा,
मांगवडा, चांभारवाडा, न्हावीवाडा, कुंभारवाडा
आहे. तसा आमच्या
पण गावाच्या बाहेरच्या
अंगाला, खुप खुप
खुप अगदी पृथ्वीवर
माणूस जन्माला आल्यापासून
धर्माच्या मातीत कालवून जातींच्या
भक्कम दगडांनी या
वाड्यांची भक्कमपणे उभारणी झालीय.
देशमुखाच्या वाड्यातली कमलाबाई आणि
मांगवडयातली ताराबाई कडूसं पड़तानाच्
अगदी अर्ध्या तासाच्या
फरकानं मेल्या. देशमुखाची कमलाबाई
मेली तसं समदं
गाव तिच्या वाड्याकडं
गडबडीनं पळालं. घरादारासह साऱ्या
भावकीतल्या बायकानी "गेली गं
बयाssss" म्हणून मोठ्यानं गहिवर
घातला. त्यांच्या ओरडण्यानं गावातली
समदी कुत्री अंधारातनं
दिसल तिकडं भुंकत
सुटली भावकीतल्या नवीन
लग्न झालेल्या सूना
पदर डोक्यावर घेवून
एखदा जीवनातला वाईट
प्रसंग आठवून कसनुसं तोंड
करून रडायला येतय
का ते बघत
होत्या. मडयापूढं बसलेल्या काही
बायका इतक्यातनं पण
हळूच वळून त्यांच्या
गळ्यातल्या दागिन्याकडं चोरून बघत
होत्या.
पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....
पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....
No comments:
Post a Comment