यसाबाई तांबडं फुटायच्या आधीच
उठली. अर्ध्या रात्री
उंदरांनी फळीवरचा डबा पाडल्यापासून
ती जागीच व्हूती.
पोरींच्या काळजीनं तिचा डोळ्याला
डोळा लागला न्हवता.
"आरं उठा रं
पोरानु उजाडलय! लवकर आटपाय
पायजेल आज" म्हणत गण्याला
अन शालूला हलवून
जागं करत दाराची
कढी काढून लगबगीनं
बाहेरच्या सोप्यात आली. कर
कर वाजलेल्या दाराच्या
आवाजानं सोप्यातल्या खाटीवर पहाटे
पासूनच विचार करीत जागं
असलेल्या शंकर नानानं
तोंडावरची वाकाळ काढून,"आव
उठा की वं?
तयारीला लागाय पायेजेल लवकर!"
म्हणत बाहेर गेलेल्या
बायकोकडं डोकावून बघितलं. सोप्यात
झोपलेली म्हातारी तर कधीच
उठून भिंतीला टेकून
मिसरी घासत बसली
व्हूती. यसाबाईनं गोठ्याच्या एका
बाजूच्या कुडानं झाकलेल्या खणातली
दोन दिसापूर्वी व्यालेली
शेरडी पलीकडच्या गरीब
म्हाताऱ्या बैलाच्या मागच्या मेढीला
आणून बांधली. तशी
रातभर तुंबलेली शेरडी
भसाभसा रिकामी झाली.
पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....
पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....
No comments:
Post a Comment