Friday, June 15, 2018

गोदानानीची बकुळा

पावसाळा आला की सणगराच्या आळीतली गोदानानी आठवते. पदराला चिकटलेल्या चार पोरी आणि सोफ्यातल्या कुडाला बीडी ओढत बसलेला उघडा दारुडा नवरा घेऊन, गळक्या घरावर कोसळणारा अक्खा पाऊस गोदानानी दिवस रात्र घरात झेलायची. बकुळा, जाई, जुई आणि शेवंता अशा फुलासारख्या चार लहान पोरींचं पावसाळ्यात खाण्या पिण्याचं प्रचंड हाल व्हायचं. हाताला काम नसायचं आणि ओल आलेल्या चुलीच्या कोपऱ्यात जळणाचं काटूकसुद्धा नसायचं. दिवस रात्र पाऊस रपरप आणि सोफ्याच्या तुटक्या पत्र्यावर तडतड वाजत राहायचा. दारात पाण्याचा डोह साठायचा. त्यातून वाट शोधता यावी म्हणून पाण्यात दगडाच्या चीफा टाकलेल्या असायच्या. दगडावर पाय टाकायला चुकलाच तर खाली गुडघाभर पाण्यात पाय जायचा. घरा पुढचा उकिरंडा पाण्यात गडप व्हायचा. त्यात रात्रभर डराव डराव बेडकांचा आवाज चाले. रात्र झाली की तिच्या घराच्या उंबऱ्यावर एक सुतळी वातीचा दिवा लुकलुकताना हमखास दिसायचा. अन दिव्याच्या उजेडात आजूबाजूला तिच्या पोरी पाट्या दप्तरे घेऊन बसलेल्या दिसायच्या. बकुळी थोरली असल्यानं सगळ्यांना शिकवायची.

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....

No comments:

Post a Comment