Wednesday, March 14, 2018

इहलोकीचा प्रवास

...आंब्याच्या झाडाखाली सावलीत उरलेल्या आयुष्यावर शांत विचार करीत बसलेल्या त्याच्या निर्विकार चेहऱ्याकडे पहात ती म्हणाली.
"एक विचारू…?"
"हो विचार ना."
"मलाही तुझ्यासोबत शेवटच्या प्रवासाला यायचंय...नेशील?"
"हे बघ! क्षणभंगुर जीवन आहे माझं. तू सुखात रहा! आई होण्याचं भाग्य दिसतय तुझं या घरात?"
“राहिला असतास सोबत तर बरं झालं असतं!”
तो धरपडत हलला आणि तिच्या कपाळावर आपले ओठ अलगद टेकवत म्हणाला,
“मलाही तुझ्या सोबत जगायला आवडलं असतं! पण जन्म मृत्यू कुठे आहे आपल्या हातात?”
"तू दूर गेलास तरी तुझी आठवण कायम सोबत राहील." म्हणत ती ताडकन उठली.
"अगंss काय झालं? अशी एकदम का उठलीस! मी घाबरलो ना?"
"ते बघss… समोर पाहिलस का? बहुतेक तुझा इहलोकीचा अखेरचा प्रवास सुरु झालाय...”
हताश होऊन त्याने मान उंचावून समोर नजर टाकली. मालकासोबत उन्हात बोकड कापायचा चमकणारा धारदार सुरा हातात घेऊन उस्मान झपाझपा पाऊले टाकत त्याला कापण्यासाठी जवळ येत होता...”No comments:

Post a Comment