Saturday, April 15, 2017

कला म्हातारी




मी पाहिलीय...
सकाळी लवकर उठून
बांधावरच्या चेंबरचं पाणी भरून
अंगणातल्या पोफडे उडालेल्या चुलीवर
आई नसलेल्या नातीस्नी आंघोळीला तवली भरून पाणी तापत ठेवणारी
आणि त्यांना लाल रेबिनिंच्या वेण्या बांधून
गावातल्या शाळेत सोडून
नातींच्या शिक्षणासाठी रोजंदारीवर
हातात विळा घेऊन भैरुबाच्या मळ्यात
कणसं खुडायला निघालेली
वस्तीवरची थकलेली "कला म्हातारी".

No comments:

Post a Comment