Friday, January 20, 2017

पांडू तात्या

मी पाहिलाय...
गावची बलुतेदारी उघड्या अंगावर झेलत
ओढयावगळीत घुसून सालटी निघेपर्यंत
कचा कचा घायपात तोडून,
नदीतल्या डोहात भिजवान घालून
गावाबाहेरच्या माळावर
चोळी लुगडयातल्या बायकोसोबत
हातात लाकडी फिरक्या धरून
हलणाऱ्या आतड्यासोबत,
दोराला पिळ टाकुन
गावच्या गुरांढोरासाठी दोरखंड वळणारा
गावकुसाबाहेरचा उघडाबंब "पांडू तात्या".

No comments:

Post a Comment