Friday, January 20, 2017

बज्या

मी पाहिलाय...
रात्रीच्या काळोखात सामसूम झाल्यावर
ओढ्याकडंच्या वडाखाली देणं दिलेली
तळलेली कोबंडी अन चपात्या उचलून आणून
गोठ्यातल्या अंधारात बसून
पोटाची आग शांत केलेला
आणि दारिद्रयाच्या डोहात अखंड बुडालेला
वस्तीवरचा "बज्या."

No comments:

Post a Comment