Thursday, December 22, 2016

आशाताई

खालच्या बाजूच्या डोंगराआड दिवसभर थकलेला सूर्य सायंकाळी बुडाला. तशी चांदणी उगवायला शेतात धावलेली माणसं लगबगीनं घराच्या वाटंला लागली. ओढयातलं वाहणारं पाणी पिवून माळावरच्या कुरणात दिवसभर चरायला गेलेली गुरंढोरं गळ्यातल्या घंटा वाजवीत घराच्या ओढीनं, शेपटया हलवित आपापल्या गोठ्याकडं पळत सुटली होती. पांदीतून निघालेल्या बैलांच्या हंबरण्याचा आणि बैलगाडयांच्या चाकातील धावाचा दगड धोंड्यावर आपटून खडाखड़ आवाज निघत होता. पाखरांचे उंच उंच थवे गगनचुंबी झोके घेत नदीकडं उड़त चालले होते. चाल न उरकलेल्या म्हाताऱ्या कोताऱ्या बायका लुगड्याच्या ओटयात तांदळीची भाजी घेवून रानातल्या बांधावरुन आणवाणी पायानी चिखल तुडवित घराकडे चालत निघाल्या होत्या. मळ्याची पायवाट तुडवत डोक्यावरुन आणलेला ओल्या वैरणीचा बिंडा मी अंगणात गोठयाच्या कुडाला लागून फेकला. परसात कीडे टिपणाऱ्या कोंबड्या अंधार शिरलेल्या खुरुड्याकडे धावायला लागल्या होत्या.

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....

No comments:

Post a Comment