Thursday, July 28, 2016

वस्तीवरला बापू



राधाला औंधाजवळच्या वाडीत दिलेली. तिच्या लग्नासाठी बापूनं ओढ्याकडंची एक एकर जमीन मागच्या वर्षी किश्यानानाला विकलेली. पण जावई खुप तापट अन मानपानवाला मिळालेला. काही कमी पडले तर राधाला मारझोड़ करायचा. मागच्या आठवड्यात राधाला मुलगा झाला. बाळाच्या बारशाला तीन बहिणी, चार आत्या अन भावकीतल्या काही बायका घेवून येणार आहे म्हणून जावायानं अन सासूनं वाडीसनं सोडलेला सांगावा बापुच्या वस्तिवरल्या घरात येवून धडकला. तवापासनं बापुच्या घरातल्यानी एकच धसका घेतला. कुणाला जेवण गोड लागेनासं झालं. बापूचा दोन दिवस डोळ्याला डोळा लागला नाही. बारशाचा कार्यक्रम दोन दिवसावर आला. बापूनं पेरणी आटोपून घेतली. रातभर इचार करुन करून शेवटी पहाटेच्या अंधारात बापूनं गोठ्यातला कोश्या रंगाचा दावनीचा एक बैल सोडला.

पूर्ण कथा वाचा लवकरच पुस्तक रुपात.....

फोटो सौजन्य: अरुण कडवेकर



2 comments: