Thursday, July 28, 2016

गावदेवहातात हळदी कुंकवाच ताट घेवून गावच्या मारुतीच्या देवळा पुढच्या पायऱ्यावर गावची पाटलीन मोठयाने ओरडली, "आरं भाड्यानो वाजवा की अजुन जोरात" तसा बाहेरच्या उन्हात वाजंत्र्यानी रिकामी पोटं आत बाहेर करीत अजून जोर लावला अन नवरदेवाच्या आईला चार बाईकानी आडवी पाडून लोटंगणासाठी देवळा भोवती गोल गोल फिरवायला सुरवात केली. भर उन्हातान्हात देवळा भोवतीच्या तापलेल्या फरशीवर देहाला लोटांगण घेताना बसणारे चटके विसरून ती हात जोडून मुलाच्या सुखासाठी काय मागत असावी?
...लोटांगणाच्या पुढे पुढे चालणाऱ्या नवरदेवाची नजर मात्र गावच्या वेशीतून आत आलेल्या वऱ्हाडातील फुलांनी सजवलेल्या, पुढच्या गाडीतील पहिल्या सीटवर नटून बसलेल्या नवरीकडे लागलीय. कदाचित हीच सुरवात तर नसावी ना? मागे वेदना सोसणाऱ्या आईला ह्र्दयाच्या खालच्या कप्प्यात ढकलण्याची...

फोटो सौजन्य: vayeda.in

No comments:

Post a Comment