Friday, January 20, 2017

पुतळा मावशीमी पाहिलीय....
लग्नानंतर फक्त आठ दिवसांचा संसार करुन
मिलिटरीत जावून शहीद झालेल्या नवऱ्याच्या आठवणीवर
आयुष्यभर सासरी राहून जगलेली
आणि
बाहेरून सुकूनही आतून गर्भाशय जिवंत ठेवून
सत्तरी ओलांडलेली खालच्या वाडयातली
पुतळा मावशी...

No comments:

Post a Comment