Friday, January 20, 2017

बापूमी पाहिलाय...
जीर्ण झालेल्या वीस खणी वाडयाच्या बाहेर
अड़कित्यानं सुपारी कातरीत,
"एकेकाळी अत्तरांचे दिवे जाळून
पैशांच्या ढिगांवर नायकिणी नाचवून,
लयाला गेलेल्या पूर्वीच्या वैभवाच्या
जुन्या गोष्ठी सांगत,
झुबकेदार मिशांना पिळ देवून
पिंकदानीत पानाची पिचकारी मारत,
अजूनही त्याच काळात जगणारा
इनामदारी खाक्या असलेला देशमुख वाडयातला
"बापू".

No comments:

Post a Comment