Monday, December 19, 2016

चावडी

खेडी होती. खेड्यात चावडी होती. चावडीवर फेट्यांचा धाक होता. गुन्ह्याला चावडीत सजा होती. चावडीचा दरारा होता. काळजाला भिती होती. अंधाराला कंदिलाचा उजेड होता. पण काळाचा पक्षी दूर उडतो. फेट्यातली माणसं विझतात. स्मशानात माती होवून गळतात. गाव आटून जातो. चावडी ओस पडते. पार सुना सुना होत जातो...
...चावडी आजही असते. रीता पडलेला पिंपळाचा पारही असतो. पण रात्रीच्या गर्भात चावडीवर आता स्मार्टफोन खणखणतो. तर सकाळी मरीआईचा वळु बोकड सूर्याची उन्हं अंगावर झेलत, चावडीवर लेंड्या सोडत झोपून राहतो...


फोटो सौजन्य: maayboli - आशूचँप

No comments:

Post a Comment